top of page

परिचय

 डॉ किरण कुलकर्णी सध्या आयुक्त तथा संचालक, नगर परिषद संचालनालय या पदावर कार्यरत आहेत. या आधी ते आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र राज्य या विभागामध्ये आयुक्त पदावर होते. २००९ मध्ये भारतीय प्रशासन सेवेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी म्हणजे आय ए एस होण्यापूर्वी त्यांनी यशदा , पुणे येथे अतिरिक्त संचालक म्हणून तर मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या  ' जनवाणी ' संस्थेत संचालक म्हणून काम केले आहे. आय ए एस झाल्यावर अमरावती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, ज़िल्हा परिषद तसेच आदिवासी संशोधन व  प्रशिक्षण संस्थेमध्ये आयुक्त म्हणून काम केले आहे. 

डॉ. किरण कुलकर्णी विकास अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट असून त्यांनी अनेक विषयांमध्ये ग्रॅजुएशन  आणि पोस्ट ग्रॅजुएशन मिळवले आहे. बी कॉम (१९८८), एम कॉम (१९९०), एम ए सामाजिकशास्त्र (२००५) प्रशिक्षणाचा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम (२००५), आय एस ओ  लीड ऑडिटर (२००७), एल एल बी & एल एल एम (२०१४) पी एच डी (२०१४)

अनेक विषयांवर तज्ञ  म्हणून त्यांना राष्ट्रीय पातळीवर विविध ठिकाणी मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले जाते. उदा. माहितीचा अधिकार, आदिवासी समस्या व उपाय, घन कचरा व्यवस्थापन, प्रशिक्षण पद्धती, उद्योजकता, वनविषयक आणि पुनर्वसन कायदे, शासकीय उपक्रमांची कायदेशीर बाजू इ . 

डॉ किरण कुलकर्णी लेखक असून त्यांची आठ पुस्तके आणि ३०० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. संपादक म्हणून त्यांनी उद्योजक, शिक्षण आणि समाज, पसाय, ट्रायबल रिसर्च जर्नल या नियतकालिकांचे तर सुरेश भट-एक झंझावात, अतूट नाते या पुस्तकांचे संपादन केले आहे. ३० हून अधिक शॊर्ट फिल्म्सचे पटकथा लेखन त्यांनी केले आहे. सूत्रसंचालक आणि वक्ता म्हणून त्यांनी महाविद्यालयीन जीवनात खूप बक्षिसे कमावली आहेत. 

 

प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांचे काम नावाजले गेले आहे. एक प्रामाणिक आणि पारदर्शक काम करणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे. 

डॉ. किरण कुलकर्णी (आयएएस)

■ भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी.

■ महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व, नाट्य लेखन, संपादन, बुद्धिबळ या क्षेत्रांमध्ये अनेक पारितोषिके.

■ एमकॉम, एलएलएम, एमए ( समाजशास्त्र), पीएचडी. आदिवासी पुनर्वसनाचे आर्थिक आणि कायदेशीर पैलू हा त्यांच्या पीएचडी संशोधनाचा विषय होता.

■ नगरपरिषद प्रशासन संचालनालय आणि आदिवासी विकास या विभागांचे आयुक्तपद तसेच यशदाचे अतिरिक्त संचालक यासह विविध पदांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे आणि संवेदनशीलतेने सांभाळल्या. ■ कथा, कविता, निबंध, लेख, एकांकिका, नाटक, पथनाट्य, पटकथा, नभोवाणी मालिका, भाषण संग्रह असा बहुपैलू लेखन प्रवास. आत्तापर्यंत विविध साहित्य प्रकारांमध्ये १७ पुस्तके आणि शेकडों लेख प्रसिद्ध.

■ विचारांच्या ऊर्जेवर जगणारा प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ प्रयोगशील अधिकारी म्हणून प्रसिद्ध. लोकाभिमुख प्रशासन आणि अभ्यासपूर्ण उपक्रम ही त्यांची खासियत.

■ कुशल प्रशासक, प्रयोगशील लेखक, संवेदनशील संशोधक, ओघवत्या शैलीचा वक्ता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून सर्वश्रुत.

किरण कुलकर्णी यांची साहित्यसंपदा
•    दशांगुळे (कवितासंग्रह)
•    जागर उद्योजकतेचा
•    तिळा तिळा दार उघड (माहिती अधिकारविषयक लेखसंग्रह)
•    अनलॉक लर्निंग (स्वयंशिक्षण उपक्रमाबाबत टिपण)
•    आदिवासी शिक्षणाचा कॅलिडोस्कोप ( भाषणसंग्रह)
•    Training & Development
•    विचारांचा चष्मा (लेखसंग्रह)
•    अर्थविश्वाच्या दारात (लेखसंग्रह)
•    प्रवासी (कथासंग्रह)
•    कवाड (लघुलेखसंग्रह)
•    काचवा (दोन अंकी नाटक) पत्रलेखनाच्या पलीकडले (पत्रसंग्रह) मनाच्या चाळणीतून... (ललित लेखसंग्रह)
•    थिएटरचा पडदा उघडल्यावर (एकांकिकासंग्रह) माझा एकाक्षरी मंत्र (कवितासंग्रह)
•    Exploring the Roots (संशोधनपर लेखसंग्रह) • अतूट नाते (संपादित लेखसंग्रह)
•    Comparison between CSR provisions of Companies Act, 1956 and 2013 vis a vis Solid Waste Management Projects
•    (Dissertation)
•    Analytical study of Administrative and Legal Aspects of Tribal Resettlement (Doctoral Thesis)
(उपलब्धता : https://www.kirankulkarni.info)

 

©2019 by kiran kulkarni. Proudly created by AstronEra

bottom of page